RBI Withdraws 2000 Note: २ हजार रुपयांची नोट चलनातून माघारी घेण्याचा निर्णय का घेतला? RBI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून माघारी घेण्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचं आवाहन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलं आहे. नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. देशभरातील बँकांनी २ हजार रुपयांच्या नोटा ग्राहकांना देणं तातडीने थांबवावं, असेही आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मात्र २०१६ साली ५०० रुपये आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर चलनात आणलेली २ हजार रुपयांची नोट आता जवळपास सात वर्षांनंतर चलनातून माघारी घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने का घेतला, याविषयी आता देशातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. आरबीआयने हा निर्णय घेताना त्यामागील कारणांचाही थोडक्यात उल्लेख केला आहे.’नोटाबंदीनंतर २०१६ साली २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. मात्र इतर नोटा चलनात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने २ हजार रुपयांच्या नोटेच्या उद्दिष्टाची पूर्तता झाली. त्यामुळे २०१८-१९ मध्ये या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांपैकी ८९ टक्के नोटा या २०१७ च्या आधी बाजारात आणण्यात आल्या होत्या. ३१ मार्च २०१८ मध्ये २ हजार रुपयांच्या सर्वाधिक नोटा चलनात होत्या. याचे मूल्ल ६.७३ लाख कोटी इतके होते. मात्र नंतर चलनात असलेल्या या नोटांची संख्या कमी झाली. ३१ मार्च २०२३ पर्यंत ३.६२ लाख कोटी रुपये मू २ हजार रुपयांची नोट चलनात आणल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटली होती?
केंद्र सरकारने १ हजार आणि ५०० रुपयांची नोट बंद करत २ हजार रुपयांची नोट चलनात आणल्यानंतर या निर्णयावर मोठी टीकाही झाली होती. आधीच्या नोटा चलनातून बाद करून पुन्हा २ हजार रुपयांसाठी मोठ्या किंमतीची नवी नोट आणल्याने नोटबंदीचा नेमका उद्देश का होता, असा प्रश्नही तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. तसंच लवकरच ही नोट चलनातून बाद केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. अखेर आता रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत नागरिकांना दिली आहेल्य असणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटा चलनात राहिल्या. सामान्यत: व्यवहारांसाठी या नोटा वापरल्या जात नसल्याचं निदर्शनात आलं. तसंच व्यवहारासाठी लागणाऱ्या चलनाची पूर्तता इतर नोटा करत आहेत,’ असं रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेताना जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे.