गुन्हेगारी

खंडणी विरोधी पथकाने पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उधळून लावला

पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शेखर ओव्हाळ यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माथाडीच्या कामावरून शेखर ओव्हाळ आणि सराईत गुन्हेगार अमोल गारगले यांच्यात पंधरा दिवसापूर्वी वाद झाले होते. याच वादातून शेखर ओव्हाळ यांची हत्या करण्याचा कट अमोल गारगले, किशोर बापू भोसले आणि अमित दत्तात्रय पाटूळे यांनी रचला होता. यासाठी तडीपार गुंड रविराज केदार यांच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आणली होती. परंतु, त्याअगोदरच त्यांचा हा डाव हाणून पाडत खंडणी विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे. पैकी पिस्तुल पुरवणारा आरोपी रविराज फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात पिंपरी- चिंचवडच्या खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल गारगले हा त्याच्या साथीदारांसह पुनावळे परिसरात माथाडीचं काम करतो.

शेखर ओव्हाळ यांची पाच एकर जमीन नुकतीच डेव्हलपमेंटसाठी बिल्डरला देण्यात आली आहे. तिथल्या माथाडीच्या कामावरून शेखर ओव्हाळ आणि अमोल गारगले यांच्यात वाद झाले होते. माथाडीचं हे काम हातातून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला काम मिळणार नाही. या उद्देशाने शेखर ओव्हाळ यांची हत्या करण्याचा प्लॅन अमोल गारगले याने केला. सोलापूर मंगळवेढा येथून तडीपार गुंड रविराज केदारी याच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काढतुसे आणली. पुढील दोन – तीन दिवसांमध्ये ओव्हाळ यांची हत्या करण्याचा प्लॅन झाला. त्या अगोदरच खंडणी विरोधी पथकाने संबंधित आरोपींच्या मुस्क्या आवळत हत्येचा कट उधळून लावला आहे.  काही वर्षांपूर्वी पुनावळे परिसरात माथाडीचं काम देशमुख नावाचा व्यक्ती करत होता. त्या व्यक्तीला फायरिंग करून आरोपी यांनी पळून लावलं होतं. तेव्हापासून त्या परिसरातील माथाडीचं काम आरोपीना मिळालं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा माथाडीचं काम हातातून जाईल म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला होता. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, अशोक दुधवणे, अमर राऊत, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस यांच्या टीम ने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button