मुंबई

गिरगावातील ‘या’ कंपनीची लिंक्डइन पोस्ट होतेय व्हायरल मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री?

Linkedin वर ग्राफिक डिझायनरची जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं

आम्हाला ग्राफिक्स डिझाईनरची गरज आहे. मुंबईतील गिरगावमध्ये नोकरीची संधी असणार आहे. 1 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी वर्षाला 4.8 लाखांचे मानधन देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी अडॉब फोटोशॉप, अडॉब इलुस्ट्रेटर, टायपोग्राफी इत्यादी हाताळण्यात पारंगतता असायला हवी. मात्र, मराठी लोकांचे या नोकरीसाठी स्वागत करण्यात येणार नाही, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते. LinkedIn वरिल ही जाहिराता पाहाता पाहाता संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जाऊ लागला. नेटकऱ्यांनी Linkedin सह सर्व प्लॅटफॉर्मवरती ट्रोलिंग सुरु केल्यानंतर एचआरवर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील मराठी लोकांना दुय्यम वागणूक कशामुळे असा सवाल नेटकरी विचारू लागले आहेत. मुंबईतील गिरगाव मध्ये ज्या फ्री लांसर कंपनीने मराठी माणसांना नोकरी साठी अर्ज करू शकत नाही, अश्या पद्धतीचा सोशल माध्यमावर मेसेज व्हायरल केला. त्या कंपनी ची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहिती आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. अशी पोस्ट टाकता येते का ते? तपासून पाहायला सांगितल जाईल. आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं असताना अशा पद्धतीची पोस्ट टाकता येते का याची माहिती मागवली जाईल. अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील, आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू पण असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button