पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर ! शहरातील पब, बारची झाडाझडती सुरू….

मुंबई : मुंबईतील अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आलेत.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त पथकाने मुंबईतील अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती सुरू केलीय पुणे पोलिसांनी दोन दिवसांत पोलिस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने १३१ ठिकाणी धाडी टाकून ४३ बारवर कारवाई केलीय.
या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
२१ वर्षांखालील तरुणांना दारू विकल्याप्रकरणी दोन कारवाया, टेरेस रूफटॉपमध्ये अवैध दारू पुरवठा केल्याप्रकरणी तीन कारवाया आणि उशिरापर्यंत महिला वेट्रेसद्वारे दारूसेवा पुरविणाऱ्या तीन ठिकाणांसह अन्य कारवाया करण्यात आल्यात.
शहरात करण्यात आलेल्या २३ कारवाया उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरीत्या मुंबई शहर, जिल्ह्यात राबविण्यात आल्यात. विशेष तपासणी मोहिमेत एकूण २३ बारवर विविध स्वरूपाचे नियमभंग केल्याप्रकरणी कारवाया करण्यात आल्यात. यामध्ये २१ वर्षाखालील व्यक्तींना मद्यविक्रीच्या २ कारवाया, विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री व परवाना कक्षाबाहेर मद्यविक्रीच्या ११ कारवाया, ऑर्केस्ट्रा बारमध्ये उशिरा महिला नोकर काम करताना आढळल्याने १० लेडीज बारवर कारवाई करण्यात आले आहे.