मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक

मुंबई :  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) दुपारी १२.०० ते दुपारी१.०० वाजेदरम्यान हे काम करण्यात येणार असून त्यासाठी थ्री लेग सर्व्हिसेबल गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरु करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत कि.मी १.५५० येथे मुंबई ते पुणे (पुणेकडे जाणाऱ्या वाहिनीवर) गॅन्ट्री बसविण्याचे काम आज करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग ,वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कळंबोली कि.मी.००.००० येथून डावे बाजूस वळवून कळंबोली सर्कलवरुन कळंबोली-डी-पाँईट – करंजाडे – पळस्पे व पुढे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरुन मार्गस्थ करता येतील.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी सर्व प्रकारची वाहने राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन पुढे जावून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पाँईट कि.मी. ४२ ००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवरील (मुंबईहून पुणेकडे) जाणारी हलकी वाहने ही कळंबोली कि.मी. ००.००० येथून होते डावे बाजूस वळवून कळंबोली सर्कलवरुन मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरुन मार्गस्थ करता येतील.द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कोन ब्रिजवरुन वळवून घेवून कि.मी. ०९.८०० येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button