पुणे

पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर दानवेंचा सवाल, मुश्रीफ म्हणतात, चौकशी करणारे किती स्वच्छ, आमचा हस्तक्षेप नाही!

ससून रूग्णालयातील   डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या डॉ.पल्लवी सापळेंच्या नेतृत्वाखालच्या समितीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. सापळे यांची जेजे रुग्णालयातील सामान खरेदी-विक्री प्रकरणात चौकशी सुरु आहे. अशात त्यांना चौकशी करायला देणं आम्हाला मंजूर नाही, असं ट्वीट अंबादास दानवेंनी केलं आहे.

अंबादास दानवे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे दिले.  मुळात डॉ. सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी, यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता. यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेत घोषणाही केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतू वर शंका आणणारे आहे? ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही.. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी.डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती ही वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्फत होते. डॉ. पल्लवी सापळे यांची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एबीपी माझा’ला माहिती दिली आहे.   आयुक्तांकडून सेवा ज्येष्ठतेनुसार पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून पल्लवी सापळे यांना तत्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत.  अहवाल प्राप्त होताच तत्काळ योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांवरील कारवाई तांत्रिक कारणस्तव अडकू नये यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोन जणांना चिरडलं.अल्पवयीन आरोपीच्या वडीलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकारासाठी एसआयटी समिती गठीत करण्यात आली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button