ठाणे

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर ‘या’ दिवसापासून 10% कपात

आजपासून 5% पाणीकपात करण्यात आलीये. मुंबई महापालिकेकडून ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा होतो. मुंबईत 5% पाणी कपात लागू गेल्यानंतर त्याचा फटका ठाणे शहरालाही बसलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा कमी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय बीएमसीने पाणीकपात केलीय. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 590 एमएलडी पाणी विविध स्रोतांमधून पुरवठा केला जात असून 85 एमएलडी पाणी पुरवठा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येतो.

दरम्यान उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता ठाणे महानगर पालिकेनं 5 जूननंतर 10%पाणीकपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलंय.ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर नं 1, किसन नगर नं 2, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं 1, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात 5 टक्के पाणीकपात असणार आहे. तर 5 जूननंतर 10 टक्के पाणीकपात असणार आहे.  दरम्यान या पाणी कपातीच्या काळात पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असं आवाहन नागरिकांना केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button