maharastra

मोदींच्या शपथविधीनंतर पेट्रोलचे दर बदलले….

रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर आज सोमवारी इंधनाच्या दरात काही बदल झाला आहे का, आपण जाणून घेणार आहोत. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित केल्या आहेत. तर आजचे दर सुद्धा सकाळीच जाहीर झाले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी नागरिकांना दिलासा मिळणार की, त्यांच्या खिशाला देखील कात्री बसणार हे आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊ. देशात सकाळी वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या…तर आज महाराष्ट्रातील इतर शहरांत काय सुरु आहे भाव खाली दिलेल्या तक्त्यात जाणून घेऊ या…सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीचे समीक्षण करून सकाळी सहा वाजता नव्या किमती जाहीर करतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तसेच हे दर जाहीर केल्यावर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०४.२४ ९०.७७
अकोला १०४.०५ ९०.६२
अमरावती १०५.०६ ९१.५९
औरंगाबाद १०४.६६ ९१.१७
भंडारा १०४.७४ ९१.२७
बीड १०५.५१ ९२.०१
बुलढाणा १०५.१८ ९१.७०
चंद्रपूर १०४.८६ ९१.४१
धुळे १०३.९८ ९०.५३
गडचिरोली १०५.४३ ९१.९४
गोंदिया १०५.३८ ९१.८९
हिंगोली १०५.८५ ९२.३४
जळगाव १०५.०४ ९१.५३
जालना १०६.१२ ९२.५८
कोल्हापूर १०४.८२ ९१.३६
लातूर १०५.१९ ९१.७०
मुंबई शहर १०४.२१ ९२.१५
नागपूर १०४.०५ ९०.६१
नांदेड १०६.०० ९२.४९
नंदुरबार १०५.४२ ९१.९२
नाशिक १०४.४८ ९१.००
उस्मानाबाद १०५.३३ ९१.८३
पालघर १०३.९७ ९०.४८
परभणी १०६.३९ ९२.८६
पुणे १०३.८७ ९०.४०
रायगड १०४.०६ ९०.५६
रत्नागिरी १०५.९३ ९२.४२
सांगली १०३.९६ ९०.५३
सातारा १०४.८३ ९१.३३
सिंधुदुर्ग १०५.७५ ९२.२४
सोलापूर १०४.५८ ९१.११
ठाणे १०३.७४ ९०.२५
वर्धा १०४.११ ९०.६७
वाशिम १०४.८३ ९१.३६
यवतमाळ १०५.६२ ९२.१३
  1. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button