मुंबई

राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज, सीबीआय,ईडी,आयटी बाजूला ठेवून मैदानात या…

मला सरकारमधून मोकळं करुन काम करायची संधी द्या, हे मी निराशेतून बोललो नव्हतो. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही तर लढणारा व्यक्ती आहे आणि आमची प्रेरणा काय आहे.  तर चारही बाजूने घेरल्यानंर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने मैदानात उतरुन सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत. त्यामुळं कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात असं बोललो तर ते सत्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्यव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘काल मी फडणवीसांचे भाषण ऐकलं. ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या. ईडी, सीबीआयशिवाय आमच्यासमोर एक मिनिटदेखील मैदानात दिसणार नाही,’ असं आव्हान खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, ‘या ज्या संस्था आहेत त्याचा गैरवापर करुन आमच्याशी लढता. बाकी तुमच्याकडे आहे काय. तुमच्यासारखे डरपोक लोक मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कुठे पाहिले नाहीत.’एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही. ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार. हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. त्यांना काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ले करा आणि त्यांना कमजोर करा. या तिन्ही पक्षांना यासाठी सुपाऱ्या दिल्या आहेत. या सुपार्‍या त्यांनी यासाठी स्वीकारले आहेत कारण त्यांना सांगितलं आहे की नाही तर तुम्हाला आम्ही तुरुंगात पाठवू. तुम्हाला दिलेली ड्युटी तुम्ही पूर्ण करा, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button