गुन्हेगारी

बागेश्वर बाबांच्या माणसांकडून ,उमेदवाराला बेदम मारहाण; आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांनी कारवाईवर संशय,

अशोक शर्मा या उमेदवाराला बागेश्वर बाबांच्या पदाधिकार्‍यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या अशोक शर्मा या उमेदवाराने देखील मतदारसंघात बागेश्वर धाम  यांचा सत्संग आयोजित करण्यासाठी आपल्या मित्राच्या माध्यमातून बागेश्वर धाम महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. कार्यक्रमासाठी साडेतीन कोटी रुपयांची मागणी उमेदवाराकडे करण्यात आली होती.मात्र उमेदवाराने असमर्थता दाखवल्यानंतर त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. यात वर्मा यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबतचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आले. यावरून अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी दहा ते बारा गुंडांना सोबत घेऊन मध्यस्थी करणाऱ्या मुंबई स्थित नितीन उपाध्याय यांच्या घरात घुसून संपूर्ण कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यासोबत घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू, दाग-दागिने लंपास केले.या प्रकरणी अभिजीत करंजुले यांच्यासोबत दहा ते बारा जणांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपींना अटक झाली नाही. परिणामी, राजकीय दबाव असल्यामुळेच आरोपींना अटक केली जात नसल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला आहे. अनेक कारणांमुळे प्रसिद्धी झोतात राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाला निवडणूक काळात देखील फार मागणी होती.शिवाय धीरेंद्र शास्त्री महाराजांचे देशभरात अनेक भक्त आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच अनुषंगाने निवडणूक काळात त्याचा आपल्या फायदा होऊ शकतो, या अनुषंगाने राजस्थान येथे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या अशोक शर्मा या उमेदवाराने देखील मतदारसंघात बागेश्वर धाम यांचा सत्संग आयोजित करण्याचे योजले होते. मात्र त्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांची मागणी उमेदवाराकडे करण्यात आली होती.दरम्यान इतका मोठा खर्च करणे शक्य नसल्याने अशोक शर्मा यांनी असमर्थन दर्शवत आपला निर्णय बदलला. तसेच त्यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप वायरल करण्यात आली. हे संभाषण वर्मा यांनीच वायरल केल्याच्या संशयातून बागेश्वर धाम महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी दहा ते बारा गुंडांना सोबत घेऊन मध्यस्थी करणाऱ्या मुंबई स्थित नितीन उपाध्याय यांना बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकरणी पोलीस राजकीय दबावा पोटी कारवाई करण्यास करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप  नितीन उपाध्याय यांनी केलाय. तर दुसरीकडे ही घटना घडून बराच काळ लोटूनही आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button