सणासुदीत सोन्याचे दर पुन्हा वाढले, आज 24 कॅरेटचा भाव किती?
आज बुधवारी सकाळी वायदे बाजारात सोनं महागलं आहे. दोन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आज सोनं वधारलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. आज किती रुपयांनी वाढले सोन्याचे भाव जाणून घेऊया.
व्यापारी व स्थानिक विक्रेत्यांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे कारण म्हणजे मागणीत वाढ. तसंच, फेडरल रिझर्वकडून गुंतवणुकदारांना अमेरिकेच्या व्याज दर आणि इतर संकेताची प्रतीक्षा आहे. या कारणांमुळंही सोन्याच्या किंमतीत स्थिरता आली आहे. तसंच, इतर देशातील युद्धजन्य परिस्थितीचाही मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 77,890 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. चांदीची किंमत 1हजारांनी घसरून 92,500 रुपये प्रतिकिलोग्रामवर पोहोचली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 450 रुपयांनी घसरुन 71,400 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 58,420 रुपयांवर आज स्थिरावले आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,400 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,890रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,420 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,140 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 789 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 842 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,312 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,420 रुपये