कुर्ल्यानंतर सीएसएमटी परिसरात बेस्ट बसचा अपघात, बेस्ट बसखाली येऊन एकाचा मृत्यू …

कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. ही घटना ताजी असताना सीएसएमटी परिसरात बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये बेस्ट बसने एकाला उडवलं आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जीपीओ परिसरामध्ये बेस्ट बसने एका पादचाऱ्याला उडवलं. या बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून A२६ या बसने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला उडवलं आहे.ही घटना आज ११ डिसेंबर ) दुपारी ४ वाजून२५ मिनिटांनी घडली असून ही बस सीएसएमटीमधील अनुशक्ती नगरहून इलेक्ट्रिक हाऊसकडे जात असताना हा अपघात झाला. बस क्रमांक ६९७२ (एमएच ०३ ईसी ०१७४) असून या बसचे चालक ज्ञानदेव नामदेव जगदाळे तर नंदकिशोर शंकर लांबखडे वाहक म्हणून कार्यवाह आहेत. या अपघाता एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेकांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४९ जखमींवर उपचार सुरू आहेत.जखमींना सायन आणि कुर्ला भाभा येथे दाखल करण्यात आले आहे. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे हा अपघात झाला. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीला जात होती. या बेस्ट बसेस बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) चालवतात. आरोपी चालक संजय मोरे (५४ ) सोमवारी पहिल्यांदाच बस चालवत होता. १ डिसेंबर रोजीच ते बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून रुजू झाले होते. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे. संजयविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत त्याने बसच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबाबत संभ्रम असल्याची कबुली दिली. तर कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आरटीओ टीमने बसची तपासणी करताना त्याचे ब्रेक व्यवस्थित काम करत असल्याचे आढळले. मात्र, तपास अहवाल सादर करण्यापूर्वी आणखी काही गोष्टी तपासण्यासाठी त्यांनी ‘ऑलेक्ट्रा’ आणि बेस्ट या दोघांकडून काही तपशील मागितले आहेत. ड्रायव्हरला ‘क्लच’ आणि ‘गियर’ शिवाय स्वयंचलित ट्रान्समिशन बस चालवण्याचा अनुभव नव्हता आणि १२ मीटर लांबीचे वाहन चालविण्यास परवानगी देण्यापूर्वी कदाचित त्याला योग्य प्रशिक्षण दिले गेले नव्हते.“जर ड्रायव्हरला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने बस चालवण्याचा अनुभव नसेल, तर तो वेग वाढवण्याचा आणि सुरुवातीला ब्रेक लावण्याचा योग्य निर्णय घेऊ शकला नसता, त्यामुळे हा अपघात मानवामुळे झाला असावा असे वाटते. त्रुटी.” अधिकाऱ्याने सांगितले की, आरटीओने अपघातग्रस्त बसची तपासणी केली असता ब्रेक आणि इतर सर्व यंत्रणा ठीक असल्याचे आढळून आले. आरटीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक बस अवघ्या तीन महिन्यांची होती. पुण्यातील दुस-या एजन्सीमार्फत चालकाला कामावर ठेवले होते. रेकॉर्डनुसार, ड्रायव्हर २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ड्युटीवर रुजू झाला होता आणि १ डिसेंबरपासून त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.