नंतर मोठा राडा, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल,कचऱ्याचे टोपले ठेवल्यावरून झाला वाद ?

बार्शीटाकळी :कचरा भरलेले टोपले ठेवण्यावरून दोन गटांत वाद होऊन मारहाण झाली. यामध्ये एक जण जखमी झाला असून, बार्शीटाकळी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नजीमोदीन शेख निजामोदीन, (रा. इंदिरानगर) यांनी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.नगर पंचायतचे कचरावाहू वाहन सोमवारी (दि. १६ ) आले होते. ते कचरा घेऊन निघून गेले. मात्र, त्यांच्या घराजवळ संकूलातील लोकांनी कचरा भरलेले टोपले तसेच ठेवले होते. शेजारी राहणारे शेख मेहमूद शेख कलंदर यांनी घराजवळ कचरा का ठेवला ? अशी विचारणा करीत त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. त्याची आई, बहीण व भावाने शेख मेहमूदला शिवीगाळ करू नका, असे सांगितले. दरम्यान, शेख मेहमूद याची दोन मुले शेख मोईन व शेख मोहसीन यांनी त्यांच्यावर व त्यांचा भाऊ शेख काझीमोद्दीन यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
नाझीमोदीन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख मेहमूद, शेख मोईन, शेख मोहसीन आणि शेख तन्नू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच रूबिना परवीन शेख मेहमूद यांनी पोलिसांत फिर्याद दिली. आरोपीने त्यांना शिवीगाळ केली व पती शेख महेमूद, मुलगा शेख मोहसीन व शेख मोईन यांच्यासह मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख अलीम शेख निजाम, शेख नजीम, शेख काजीम, शेख निजाम, शेख समीर शेख फरीद आदीवर गुन्हा दाखल आहे.