मुंबई

मुंबई बोट दुर्घटनेत केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला,पत्नी गर्भवती, ४ वर्षांचं मूल

या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर दोघं जण अद्यापही बेपत्ता असून त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे.

गेट वे ऑफ इंडियानजिक काल सायंकाळी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर दोघं जण अद्यापही बेपत्ता असून त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे. नेव्हीच्या अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्याचांही मृत्यू झाला आहे. यात नेव्हीच्या मॅकेनिकल इंजिनीअरचा देखील समावेश आहे. तरुण नेव्हीमधील मॅकेलिकल इंजिनीअरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मंगेश केळशीकर असं त्याचं नाव असून ते बदलापूचे रहिवाशी आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. मंगेश यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या प्रसंगी केळशीकर कुटुंबांचा आधार हरपला आहे.नेव्हीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. कुटुंबात मंगेश हेच एकमेव कमावते होते. त्यांच्या जाण्यानं केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला आहे. शासनाने तसेच सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा, असं आवाहन स्थानिक रहिवाशांनी केलं आहे. मंगेश केळशीकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

मंगेळ खूप मनमिळाऊ स्वभवाचा मुलगा होता. त्याचं वय देखील जास्त नव्हतं. मंगेश यांच्या मागे 4 वर्षांचं बाळ आहे. पत्नी तीन महिन्याची गरोदर आहे. त्यामुळे त्याचा असा अकाली मृत्यू फार वेदनादायी आहे. मंगेशच्या पत्नीच्या मागे कोणीच करता माणूस नाही. तिला सासरे नाहीत. तिला वडील नाहीत. ती एकटी पडली आहे. तिला आता मदतीची नितांत गरज आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.मुंबईच्या समुद्रात काल बुधवारी मोठी दुर्घटना घडली. प्रवासी बोटीला स्पीड बोटीने अचानक धडक दिली. त्यामुळे बोट समुद्रात उलटली.  या बोटीत १०० पेक्षाअधिक प्रवासी होते. मतदकार्य पोहोचेपर्यंत अनेक प्रवासी बुडाले. नेव्हीने हेलीकॉप्टर आणि बोटींच्या मदतीने सर्वांना बाहेर काढलं मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. यात १३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर   दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button