आणखी एक संतापजनक प्रकार पुण्यात,शिक्षकाने केला विद्यार्थीनींचा विनयभंग
ता. शिरूर कारेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील काही अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य करत मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिक्रापूर : कारेगाव शाळेतील शिक्षकाने शाळेतील काही अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य करत मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यापची घटना उघडकीस आली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अनिल महादेव शेळके या शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
कारेगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अनिल शेळके हा शाळेतील मुलींसोबत गैरवर्तन करणे, मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत गैर कृत्य करत असताना अनिल शेळकेने मुलींना कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. मात्र काही विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितलं.याप्रकरणी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अनिल महादेव शेळके (वय ५२ वर्षे रा. सोनेसांगवी ता. शिरूर जि. पुणे) याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे तपास करत आहे.राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला.
आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.