गुन्हेगारी

CBI ने केली मृत्यूदंडाची मागणी,‘त्या’ अत्याचार प्रकरणात कोर्ट आज निकाल देणार…

9 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

कोलकाता : वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता याप्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आज या प्रकरणात कोलकाता येथील सियालदाह येथील सेशन कोर्ट आपला निर्णय देणार आहे. 9 ऑगस्टरोजी कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात आत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

या दुर्दैवी घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली होती. देशभरात या प्रकरणातील पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळवा यासाठी आंदोलन करण्यात आले. आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली गेली. 9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर संजय रॉय नावाच्या व्यक्तीचे अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकरण कोर्टात आल्यावर 57 दिवसांनी म्हणजेच यावर कोर्ट आपला निकाल देणार आहे.अत्याचार झालेल्या पीडित तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक केली होती. हे प्रकरण हायकोर्टात गेले. कोलकाता हायकोर्टाने हे प्रकरण सीबायला सोपवले. त्यानंतर सीबीआयने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी कोर्टसमोर केली. या प्रकरणात 50 जणांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास 9 जानेवारी रोजी पूर्ण झाली.कोलकात्याच्या डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. त्यांच्या शरीरावर अंतर्गत आणि बाहेरील सुमारे 25 जखमा होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संजय रॉय नावाच्या नागरिक स्वयंसेवकाला अटक केली. पहाटे ४.०३ वाजता ते सभागृहात प्रवेश करताना दिसले. दरम्यान, एफआयआर दाखल करण्यास १४ तास उशीर केल्याने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात 9 ऑगस्ट रोजी प्रथमच प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी कोलकाता पोलिसांनी एका पोलीस स्वयंसेवकाला अटक केली. 13 ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला, त्यानंतर सीबीआयने ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरजी कार मेडिकल कॉलेजच्या 45 पेक्षा जास्त वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामा दिला.  ‘प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे न्यायासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. सध्या उपोषणाला बसलेल्या आंदोलक डॉक्टरांची प्रकृती खालावली आहे. आम्ही वरिष्ठ डॉक्टर सामूहिक राजीनामे देत आहोत, कारण सरकार उपोषणावर असलेल्या डॉक्टरांच्या बिघडलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि जर इतर काही मागणी झाल्यास आम्ही वैयक्तिक राजीनामे देखील देऊ’, असे आरजी कारच्या वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हंटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button