भाजप नेत्यांना वेगळाच संशय; बावनकुळेंनी मांडले मत,सैफ अली खान एवढ्या लवकर बरा कसा झाला?
बांगलादेशी घुसखोराने धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी होऊन त्याच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली. यावर भाजप नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे.

मुंबई : या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हल्लेखोराने सैफ अली खानवर सहा वेळा धारदार शस्त्राने हल्ला केला. तसेच पाठीमध्ये मोठा चाकूचा तुकडा अडकल्यामुळे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र रुग्णालयातून लगेचच डिस्चार्ज मिळाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. यावर आता भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांनी सैफ अली खानवरील उपचार लवकर संपल्यामुळे संशय व्यक्त केला होता. यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सैफ अली खानवर डॉक्टरांनी केलेल्या उपचारांवर संशय घेऊ नये. मात्र इतर नेत्यांनी उपस्थित केलेल्या संशयाला वाव असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरुन आणि लवकर उपचार झाल्यावरुन नवीन वादाला तोंड फुटले आहे.बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानवर हल्लेखोराने हल्ला केला. सहा वेळा चाकूने वार करुन सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला रिक्षाने तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर पाठीमध्ये घुसलेल्या चाकूचा तुकडा काढून शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खानवर हल्ला केलेल्या हल्लेखोर हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे समोर आले आहे. त्याने अवैधपणे भारतामध्ये प्रवेश करुन एका बारमध्ये नोकरी देखील केली. या हल्लेखोराने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र आता भाजपच्या अनेक नेत्यांनी सैफ अली खानवर एवढी गंभीर जखम असून एवढ्या लवकर उपचार कसे झाले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. संजय निरुपम, नितेश राणे त्याचबरोबर माजी खासदार किरिट सोमय्या यांनी देखील संशय व्यक्त केला आहे.नितेश राणे यांनी एका भाषणामध्ये सैफ अली खानवरील हल्ला आणि उपचार यावर संशय व्यक्त केला होता. मुंबईमध्ये काय सुरु आहे. त्या सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला झाला. बांगलादेशी हल्लेखोराने हा हल्ला केला. पहिले फक्त नाक्यावर उभे राहत होते. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घ्यायला आले असतील. ही घाण लेके जाओ म्हणत असतील. तो असा रुग्णालयातून चालत आला मलाच संशय आला. ह्याला काय खरंच चाकू मारला आहे की असंच एक्टिंग करुन बाहेर निघाला आहे. टुणटुण करुन नाचत आहे तो, अशा शब्दांत नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला आहे.