गुन्हे शाखेच्या पथकाने केले तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त…
सदर कारवाई ही कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर परिसरात करण्यात आली आहे.

पुणे :तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधील ही मोठी कारवाई मानली जात आहे.पहिली कारवाई कोरेगाव पार्क येथे करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी प्रणव नवीन रामनानी (१९ , रा. बंडगार्डन) आणि गौरव मनोज दोडेजा (१९ , रा. कोरेगावपार्क) याना पकडले. त्यांच्या ताब्यातून ६७ लाख ८ हजारांचा 2 ग्रॅम ७८ मिली ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. यावेळी दोन महागड्या कारही जप्त करण्यात आल्या. पोलीस अमंलदार संदीप शिर्के यांना येथील क्लोअर गार्डन सोसायटी परिसरात प्रणव आणि गौरव यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ६७ लाख ८ हजारांचा २ ग्रॅम ७८ मिली ग्रॅम कोकेन जप्त केले. तर तसेच १३६ ग्रॅम ६४ मिली गॅ्रम ओजीकुश गांजा जप्त करण्यात आला.5दुसर्या कारवाईत अमंली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड त्यांच्या अमंलदारांसह लोणी काळभोर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अमंलदार योगेश मांढरे यांना एक राजस्थानी व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने लोणकर वस्ती येथील ज्ञानाई बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावरून भरतकुमार दानाजी राजपुरोहीत (३५ ) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघेही रा. जालोर, राजस्थान) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडून तब्बल ४० किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कामगिरी अपर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शना खाली, सुदर्शन गायकवाड, अनिकेत पोटे, दिगंबर कोकाटे व त्यांच्या टीमने केली.