पिंपरीत झळकले फ्लेक्स, त्यांच्या योजना बंद करू नका अशी विनंती करण्यात आली;एकनाथ शिंदे देव माणूस
'आनंदाचा शिधा', 'तीर्थ दर्शन' यासारख्या योजना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या माध्यमातून आणल्या होत्या.

पुणे : आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्यानंतर शिंदेंच्या पक्षातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय ठरलेल्या योजना देखील बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच बोलल जात आहे.अशातच आता पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या समोर “एकनाथ शिंदे हे देव माणूस आहेत, त्यांचे निर्णय बदलू नका”. अशा आशयाचे फ्लेक्स लावून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विनंती करण्यात आली आहे. अद्याप फ्लेक्स कोणी लावले आहेत. हे समजू शकले नाही. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांनी हे फ्लेक्स लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ‘आनंदाचा शिधा’, ‘तीर्थ दर्शन’ यासारख्या योजना त्यांनी सरकारच्या माध्यमातून आणल्या होत्या. परंतु, या योजनांना महायुतीच्या सरकारने ब्रेक लावला आहे त्यांच्या पक्षातून अनेक नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. विरोधकांनी या योजना केवळ निवडणुकीपुरत्या होत्या अशी टीका केली आहे.. या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.