अजित पवारांची मु्ख्यमंत्री पदावरून अमित शाहांकडे मोठी मागणी
मराठवाड्यात मोठा फटका बसल्यानंतर अमित शाहांनी विदर्भातूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.

मुंबई: कोणत्याही क्षणी राज्याच्या विधानसभ निवडणुकांची घोषणा होऊ शकते. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेचह सुरू आहे. प्रत्येक गटाचे नेते आमदार आमचाच नेता मुख्यमंत्री होणार असे ठासून सांगत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मुख्यमंत्री पदावरून मोठी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.महायुतीतील तीनही घटक पक्षांना आलटून-पालटून मुख्यमंत्री देण्यात यावे, असी मागणी अजित पवार यांनी गृहमंत्री शहांकडे केल्याचे सांगितले जात आहे. पण खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मात्र हे फेटाळून लावले आहे. एका माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा श्रेयवाद, कट्टर हिंदूत्त्व आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहेत. त्यातच अजित पवार यांनी आक्रमत्र पवित्रा घेतला आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा फटका बसल्यानंतर अमित शाहांनी विदर्भातूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.या बैठकींनंतर अमित शाहांनी यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास तीनही घटक पक्षांना आलटून पालटून मुख्यमंत्रीपद मिळावे, असी मागणी केल्याचे बोलले जात आहे.