राष्ट्रीय
मोदींनी किरेन रिजिजूचे बदलले खाते, राजस्थान निवडणुकीआधी भाजपने फिरवली भाकरी
. रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता अर्जुनराम मेघवाल ही जबाबदारी सांभाळतील. रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, राजस्थान निवडणुकीच्या तोंडावर हा बदल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मंजुरी दिली आहे.