घरफोड्या करणार्या दोघांना ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची मोठी कारवाई…
लोणी काळभोर तसेच हडपसर परिसरात घरफोड्या करणार्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना पिस्तुलांसह गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे :युनिट सहाच्या पथकाने त्यांना पकडून चार घरफोडीचे गुन्हे उघड केले आहेत. या दोघांकडून १२ लाख १७ हजारांचा मद्देमाल जप्त केला आहे. समीर उर्फ कमांडेा हनीफ शेख (वय १९, रा. सय्यदनगर, हडपसर, गंगानगर, फुरसुंगी) आणि यश मुकेश शेलार (वय २०, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, कानिफनाथ कारखेले, समीर पिलाने व त्यांच्या पथकाने केली आहे.पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या घटना वाढतच आहेत. बंद फ्लॅट हेरून चोरटे घरफोड्या करून लाखोंवर डल्ला मारत आहेत. यापार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना या चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. यादरम्यान, चार दिवसांपासून या भागातील चोरट्यांचा माग युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण व त्यांचे सहकारी काढत होते. तेव्हा पोलस ठाण्याच्या हद्दीत पोलिस हवालदार नितीन मुंढे गस्त घालत असताना त्यांना सराईत आरोपी समीन शेख याच्याकडे दोन पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले असता त्याच्याकडून पिस्तुले जप्त करण्यात आली. त्याच्याकडील अधिक तपासात त्याला काडतुसे व पिस्तुल हे यश शेलारने पुरविल्याचे निष्पन्न झाले. दोघांकडून एक, एक पिस्तुल जप्त करण्यात आले. पुढील तपसासाठी त्यांना पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले आहे.