रांची येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने ४ पदक जिंकले…

पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ४ पदक जिंकले . तर यामध्ये पोलीस व्हिडिओग्राफी या स्पर्धेमध्ये फिरता चषक मिळविला असून झारखंडमधील रांची येथे वाणिज्य आणि संसदीय कार्यमंत्री राधाकृष्ण किशोर यांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा पार पडला.रांची येथे ६८ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये देशभरातील १८ राज्य, २ केंद्रशासित प्रदेश आणि २ युनिट हे संघ सहभागी झाले होते.तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघात ५१ पोलीस अधिकारी आणि अंमलदार,७ श्वान सहभागी झाले होते.तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे धर्तीवर २००२ पासून महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.या मेळाव्यातील विजेत्यांना १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान रामटेकडी येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीत विशेष प्रशिक्षण आणि सराव शिबीराचे आयोजन करण्यात अले होते. त्यातून अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीताची संघाची निवड करण्यात आली होती. अँटी सबोटेज चेक या स्पर्धेमधील उप स्पर्धा प्रकार ग्राऊंड सर्च मध्ये महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.श्वान स्पर्धा बॉम्बशोधक या स्पर्धेमध्ये श्वान सूर्या व श्वान हस्तक निलेश दयाळ कोल्हापूर परिक्षेत्र यांना सुवर्णपदक मिळाले आहे.पोलीस व्हिडिओग्राफी यामध्ये महाराष्ट्र संघातील स्पर्धक पोलीस अंमलदार दादा किसन गोरे एस आर पी एफ ग्रुप २ यांनी रौप्य पदक मिळविले आहे. सिन ऑफ क्राईम फोटोग्राफी यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धक पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे नाशिक शहर यांनी सुवर्णपदक मिळविले आहे.पोलीस फोटोग्राफी यामध्ये राज्य स्पर्धक पोलीस अंमलदार युगराज पुजारी एस आय पी एफ ग्रुप २ यांनी कांस्य पदक मिळविले आहे.