बाळू धानोरकर म्हणजे महाराष्ट्रात मोदी लाटेला थांबवणारा नेता – सुनाल केदार

दक्ष पोलिस न्युज प्रतिनिधी (मुंबई) : चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते.धानोरकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काँग्रेस नेते सुनाल केदार यांनी बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते.धानोरकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काँग्रेस नेते सुनाल केदार यांनी बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे नुकसान झालं आहे. बहुजन समाजाला घेऊन जाणारं हे नेतृत्व आपल्यातून गेल्याने दु:ख वाटत आहे. महाराष्ट्रात मोदी लाटेला थांबवणारा एकमेव नेता म्हणजे बाळू धानोरकर. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी आपला नेतृत्व उभे केलं होतं. खूप कमी वयात लोकप्रिय झाले होते. १५ दिवसापूर्वी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला भेटायला गेलो होतो. त्यावेळी गप्पा मारल्या होत्या. पाहून वाटले नव्हते की ते आजारी आहे, अशी प्रतिक्रिया सुनील केदार यांनी दिली.