maharastraमुंबई

RPFमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करताय? भरतीसाठी `हे` आहेत पात्रता निकष

मुंबई, 21 ऑक्टोबर : रेल्वे पोलीस दल अर्थात आरपीएफमधील नोकरीला लोकांची विशेष पसंती असते. आरपीएफमध्ये नोकरी मिळवणं ही जवळपास प्रत्येक तरुणाची पहिली पसंती असते. यासाठी आरपीएफ भरती परीक्षा देण्यापूर्वी उमेदवारांनी आरपीएफसाठीचे पात्रता निकष पूर्ण करणं अनिवार्य असते.

जे उमेदवार आरपीएफ निकष पूर्ण करू शकत नाहीत त्यांना भरती प्रक्रियेसाठी पात्र मानले जात नाही.

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांसाठी पुरुष आणि महिला अशा दोन्ही उमेदवारांची भरती केली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयात कर्मचारी बनण्याचे ध्येय ठेवणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी या भरती परीक्षेसाठी अर्ज करावा आणि आपलं नशीब आजमवावं. जर तुम्ही आरपीएफमध्ये कॉन्स्टेबलची नोकरी मिळविण्याची तयारी करत असाल तर, खाली दिलेल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.

आरपीएफ कॉन्स्टेबलसाठी वयोमर्यादा
आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुक उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावी. अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या तपशीलानुसार उमेदवारांचे वय मोजले जाते.

अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता
आरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावी. ज्या उमेदवारांनी इयत्ता 10 वीचे प्रमाणपत्र घेतलेले नाही त्यांना पात्र मानले जाणार नाही.

आरपीएफमधील कॉन्स्टेबलपदासाठी वयात सवलत
आरपीएफ कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेवारांकरिता वयात सवलत दिली जाते. यात एससी/एस प्रवर्गाकरिता पाच वर्ष, ओबीसीसाठी (नॉन क्रिमी लेअर) तीन वर्ष, माजी सैनिकांसाठी नोकरीचा कालावधी + तीन वर्षे (सामान्य)/6वर्षे (ओबीसी-एनसीएल)/ 8 वर्ष (एससी/एसटी), 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 1989 दरम्यान जम्मू -काश्मिरचे रहिवासी असलेल्यांसाठी यूआर – 5 वर्षे,ओबीसी एनसीएल 8 वर्षे, एससी/एसटी 10 वर्षे, किमान तीन वर्ष नियमित केंद्र सरकारी कर्मचारी म्हणून सेवा केलेल्यांसाठी यूआर 5 वर्ष, ओबीसी एनसीएल 8 वर्ष, एससी/एसटीसाठी 10 वर्षे, त्याचप्रमाणे विधवा किंवा घटस्फोटीत महिलांसाठी यूआर दोन वर्षे, ओबीसी एनसीएल 5वर्षे, एससी/एसटी 7 वर्षे या प्रमाणे वयात सवलत दिली जाते.

आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी आवश्यक उंची आणि छाती
आरपीएफ भरतीमधील निवड प्रक्रियेचा दुसरा टप्पा शारीरिक मापन चाचणी असते. या चाचणीचे निकष आणि अटी कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या दोन्ही पदांसाठी समान आहेत. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी उमेदवारांना पहिला टप्पा पार करावा लागेल. पहिला टप्प्यात वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाते.

आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी यूआर/ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी उंची 165, महिला उमेदवारांसाठी 157 असावी. तसेच पुरुषांची न फुगवता छाती 80 तर महिला उमेदवारांची छाती फुगवून 85 असावी. त्याचप्रमाणे एससी/एसटी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांची उंची 160, महिला उमेदवारांची 152 असावी. पुरुषांची न फुगवता छाती 76.2 तर महिला उमेदवारांची छाती फुगवून 81.2 असावी. गढवाली, मराठा, गुरखा, डोगरा, कुमाऊनी आणि सरकारने निर्देशित केलेल्या अन्य प्रवर्गातील पुरुष उमेदवारांची उंची 163, महिला उमेदवारांची 155 असावी. पुरुषांची न फुगवता छाती 80 तर महिला उमेदवारांची छाती फुगवून 85 असावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button