मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण

मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण झाले. निर्भया वाहन पथकात नव्याने ४० चारचाकी वाहने तर १८४ दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत. नरिमन पॉइंट येथे झालेल्या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री अतुल सावे, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्विक रिस्पॉन्स टीम या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अतिशय सक्षमतेने काम करते आहे. नवीन वाहनांचा पथकात समावेश होत असल्याने पथक नक्कीच अधिक कार्यक्षम बनेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.