नामांकित रुग्णालयात विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार,मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश….
कॉलेजमध्ये आणि अन्य ठिकाणी देखील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. दरम्यान आता नायर रुग्णालयाच्या या प्रकरणात नेमके काय समोर येते आणि या धक्कादायक घटनेत आरोपीला काय शिक्षा होते हे पहावे लागणार आहे.

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालित आणि मुंबई सेंट्रल या ठिकाणी असणाऱ्या नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असणाऱ्या लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. हे घृणास्पद कृत्य रुग्णालयातील एका सहयोगी प्राध्यापकानेच केल्याचे तपासामध्ये पुढे आले आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे.नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. नायर रुग्णालयातील डिन यांची तातडीने बदली करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणात तपास करून दोषींवर कडक कारवाई करू असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे he यांचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.नायर रुग्णालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष समिती साथापन करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचे डिन डॉ. सुधीर मेढेकर यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. सुधीर मेढेकर हे आता कूपर रुग्णालयात डिन म्हणून काम पाहतील. तर कूपर रुग्णालयाचे डिन डॉ. शैलेश मोहिते यांची नायर रुग्णालायच्या डिन पदी नेमणूक करण्यात आली आहे. बदलीचे आदेश काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त भूषण गगराणी यान निर्देश दिले आहेत.