Satara Crime: बेपत्ता युवकाचा खून, दोघा संशयितांना अटक
किरकोळ वादाच्या रागातून गळा दाबून केला खून

Satara: फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथील बेपत्ता सचिन नागनाथ धायगुडे (वय-३५) या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रदीप टेगले व राहुल धायगुडे (रा. डोंबाळवाड) अशी संशयितांची नावे आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. २३ मे रोजी बोरी नावाच्या शिवारात गुरांच्या धारा काढण्यासाठी जातो म्हणून सांगून सचिन गेला होता. यानंतर सचिन घरी परतलाच नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी लोणंद पोलिस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यानच, आज सकाळी सचिनचा मृतदेह केनोल शेजारी असणाऱ्या विहिरीत आढळून आला. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेवून चौकशी केली असता सचिनशी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून प्रदीप टेगले व राहुल धायगुडे यांनी गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. तर त्याचा मृतदेह बंद असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत टाकल्याची कबुली दिली. लोणंद पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.
टॅग्स :Crime ,Police, Missing ,Death, news apdate
dakshpolicenews@gmail.com