Success Story : अनाथ विद्यार्थी होणार महाराष्ट्र पोलिस; दीपस्तंभच्या मार्गदर्शनाने नियुक्ती
Jalgaon News : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलिस भरतीत ‘मनोबल’च्या सात विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाली आहे, तर दोन विद्यार्थी कर सहाय्यक, १ विद्यार्थी मंत्रालय लिपिक आणि १ विद्यार्थिनीची मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात निवड झाली आहे.यात तीन विद्यार्थी अनाथ संवर्गातून उत्तीर्ण झाले आहेत. ही अनाथ विद्यार्थी १८ वर्षांनंतर उच्च शिक्षणासाठी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात येत असतात.महाराष्ट्र पोलिस दलात निवड झालेल्यांमध्ये किरण पांडे, प्रकाश सावंत, मान्सून बावनकर हे तिन्ही अनाथ, राजश्री महाजन, दीपाली भामरे, चांदणी कोळी, अंकेश गावित यांची कर सहाय्यक म्हणून, अल्प दृष्टी मेहबूब पिंजारी, सतीश कल्याणी (अनाथ) आणि सतीश भराटे यांची मंत्रालय लिपिकपदी, मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात गायत्री पाटील हिची निवड झाली आहे.रावेरच्या राजश्री महाजनच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून, आई हॉटेलमध्ये पोळ्या करण्याचे व साफसफाईचे काम करते. मुंबईच्या किरण पांडेच बालपण अनाथ आश्रमात गेले आहे. धुडीपाडा (जि. नंदुरबार) या आदिवासी पाड्यावरील अंकेश गावितची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, आई-वडिल हातमजुरी करतात.हेही वाचा : Credit Card फसवणूक….काय घ्याल काळजी?यात प्रकाश सावंत (मुंबई), दीपाली भामरे (तळवाडे, जि. नाशिक), मान्सून बावनकर (नागपूर), चांदणी कोळी (पाचोरा), मेहबूब पिंजारी (सांग्रोली, जि. नांदेड), सतीश कल्याणी (अंधोरी, लातूर) सतीश भराटे (बार्शी), गायत्री पाटील (पिंपळखेडे, ता. पारोळा) हे यशस्वी विद्यार्थी आहेत. एक वर्षापासून ते तीन वर्षांपर्यंत हे विद्यार्थी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात प्रशिक्षण घेत होते.महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील अनाथ मुलांसाठी दीपस्तंभ मनोबलमध्ये २०१६ पासून निवासी प्रशिक्षण सुरू झाले आहे. शासनाने एक टक्का आरक्षण दिले आहे. मात्र, त्याचा फायदा होण्यासाठी या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या निवासी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ती गरज महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ भागविण्याचा प्रयत्न करीत आहे.