Firing in Kalyanकल्याणमधील काळा तलाव परिसर गोळीबारानं हादरला; दोघांकडून गाड्यांची तोडफोड, एका तरुणालाही मारहाण

कल्याण : दहशत माजवण्यासाठी दोन तरुणांनी हातात पिस्तून घेऊन गोळीबार (Firing in Kalyan) केला. गाड्यांची तोडफोड करत एका तरुणाला मारहाण केल्याची घटना कल्याण काळा तलाव परिसरात (Kalyan Kala Talav) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी दोन आरोपींची नावे असून, हे दोघे चंदन भदोरिया नावाच्या व्यक्तीच्या शोधात आले होते. चंदन व गोळीबार करणाऱ्या या दोन्ही आरोपींमध्ये जुना वाद होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. कल्याणमधील काळा तलाव परिसरात विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके यातून तरुणांनी गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाहीतर त्यांनी या वेळेला काही गाड्यांची तोडफोड केली. हे दोन्ही आरोपी चंदन नावाच्या व्यक्तीच्या शोधात होते. त्यांनी एका तरुणाला चंदनचा पत्ता विचारला तरुणाने नकार देत असताना त्याला देखील मारहाण केली.
अर्धा-पाऊण तास धिंगाणा
सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांचा धिंगाणा सुरू होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक व प्रथमेश हे दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांचा चंदन नावाच्या व्यक्तीशी जुना वाद आहे, याच वादातून चंदनला शोधण्यासाठी काल हे दोघे त्या ठिकाणी आले होते. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत.