गुन्हेगारी

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला ठोकल्या बेड्या,पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व जीवंत काडतूस जप्त केले असून, ही कारवाई लोणी काळभोर परिसरात करण्यात आली आहे.अनिकेत गुलाब यादव वय २२, रा. सोपाननगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे यांनी ही कारवाई केली.

यादव याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. त्यानंतर यादव येरवडा कारागृहात होता. न्यायालयाकडून त्याने जामीन मिळविला. नुकताच तो कारागृहातून बाहेर पडला. दरम्यान, यादव याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकटे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.पुणे पोलिसांनी गेल्या तीन ते चार वर्षात मोक्कानुसार कारवाई करून अडीचशे ते पावणे तीनशे टोळ्यांवर कारवाई केली. टोळीतील दीड हजार गुन्हेगारांना कारागृहात पाठविले. मात्र, कशाही कारवाई केल्याने आता न्यायालय पोलिसांनाच प्रश्न विचारत आहे. दुसरीकडे यातील जवळपास ८०० हून अधिक गुन्हेगार जामीनावर बाहेर आले आहेत. ते आता मोक्काचे लेबल लावून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. परिणामी गुन्हेगारीत वाढ तर झाली आहेच परंतु, पोलीस कारवाईलाही कोणी जुमनात नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता अशा गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गुन्हे शाखेने जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडाची यादी तयार केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button