मुंबई

महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवमहिला बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरेभारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील महिला परिषदेच्या समन्वयक सुशान जान फरर्ग्युसनउपसमन्वयक कांता सिंहराकेश गांगुली उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीमहिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक महिला वर्गाला व्हावीमहिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंधासाठी गाव पातळीवर हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी नव्याने गावपातळीवर गावस्तरीय महिला समित्या नेमणेमहिलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणेपर्यटनावर आधारित महिलांसाठी रोजगार निर्मिती करणेमहिलांना  आर्थिकदृष्ट्या सक्षम करणेमहिलांसाठी विकासाभिमुख योजना राबविण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषद समवेत लवकरच राज्य कृती आराखडा तयार करेल. राज्यात तो प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button