गुन्हेगारी

२१ वर्षांचा तरुण मुंबईत करायचा अमली पदार्थांची तस्करी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी १३ लाख रुपये किमतीचे ६५ ग्राम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अहमद रजा मोहम्मद रफीक खान (२१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरातून एका अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ११ ला यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा ड्रग्स तस्कर असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी १३ लाख रुपये किमतीचे ६५ ग्राम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अहमद रजा मोहम्मद रफीक खान (२१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेण्यासाठी कक्ष ११ चे पोलीस निरीक्षक भरत घोणे, सपोनि अभिजीत जाधव, सपोनि विशाल पाटील, पोउनि. सावंत व पथक असे जोगेश्वरी पश्चिम परीसरात आले होते. त्यावेळी जोगेश्वरी एस वी रोड परिसरातील अजित ग्लास जवळ अहमद रजा मोहम्मद रफीक खान (२१ वर्षे) तरुण रस्त्याचे कडेला संशयास्पद स्थितीत आढळला.

पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्याची झडती घेतली. त्यानतंर त्याचेकडे १३,००,०००/- रू किंमतीचा ६५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ त्यासोबत २ मोबाईल फोन व ५०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाणे येथे कलम ८(क) सह २१(क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ प्रमाणे दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधिकचा तपास करत असून एमडी अमली पदार्थ कोणाकडून आणला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button