डी.के.रावला अटक छोटा राजनचा हस्तक, हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर कारवाई
मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली,डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे...

मुंबई :छोटा राजन गँगचा हस्तक डी.के. राव आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. राव याच्यावर हॉटेल मालकाची मालमत्ता लुटण्याचा आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप आहे. या प्रकरणात हॉटेल मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली होती.हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर कारवाई करत पथकाने काल (२२ जानेवारी) रात्री सात जणांना अटक केली. यामध्ये डी.के. राव हा या टोळीचा मोरक्या असल्याची माहिती आहे. डी.के. रावल यांना २०२२ मध्ये उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. डी के राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. डी के राव पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. डी.के. रावसह सर्व सात आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
अलिकडच्या काळात खंडणी आणि खंडणी मागण्यात डीके राव यांचे नाव समोर आलेले हे दुसरे मोठे प्रकरण आहे. याआधी २०१७ मध्ये, अॅटॉप हिल येथील एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी वसूल केल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. प्रसिद्ध अजय गोसालिसा गोळीबार प्रकरणातही डीके राव यांचे नाव पुढे आले. डीके राव अनेक गुन्ह्यांसाठी तुरुंगात गेला आहे.डी. के. राव हा दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू होता. डीके राव ९० च्या दशकात मुंबईतील एक प्रसिद्ध गुंड होता आणि त्याने अनेक वर्षे छोटा राजनसोबत काम केले होते. त्याच्यावर नाव खूनांसह अनेक गुन्ह्यांमध्ये दाखल आहेत.