संभाजी भिडे यांना पोलिसांकडून अटक

येथील बडनेरा रोडवरील एका मंगल कार्यालयातील कार्यक्रमात महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविणारे संभाजी भिडे यांना राजापेठ पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात आली आहे.
नोटीसमधून त्यांना दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. तो तपासाचा भाग असला तरी ती नोटीस भिडे यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांनी दिली.
भिडे यांच्याविरुद्ध ज्या वक्तव्यापोटी गुन्हा दाखल झाला, त्या वक्तव्याचे ऑडिओ राजापेठ पोलिसांकडून ऐकले जात आहेत. ते ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १० या कालावधीत संभाजी भिडे यांनी एका मंगल कार्यालयात उद्बोधन केले होते. त्यादरम्यान त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाज घटकांमध्ये वाद वाढविण्याचे भाष्य केले. तथा महापुरुषांची बदनामी केली, अशी तक्रार राजापेठचे अंमलदार मंगेश शिंदे यांनी २९ जुलै रोजी पहाटे ३ च्या सुमारास नोंदविली होती. त्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे (रा. सांगली), निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले यांच्यासह अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार नोटीस पाठविण्यात आली आहे.