मुंबई

जोगेश्वरी मध्ये रिक्षा चालकाच्या गळ्यावर चाकू लाऊन लुटले

जोगेश्वरीत जेव्हीएलआर मार्गावर शनिवारी मध्यरात्री एका रिक्षाचालकाला चोरट्यानी गळ्यावर चाकू लावून लुटले. त्‍याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम 12,900 लुटले.

ही घटना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अरुण कुमार बिंद हे रिक्षाचालक गोरेगाव येथील भाडे सोडून भांडुपकडे जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी रिक्षा थांबवली व पवई येथे जायचे आहे असे सांगून रिक्षात बसले. दरम्यान रिक्षा जे.व्ही.एल.आर. रोडने पवईच्या दिशेने जात असताना रामवाडी परिसरात आली असताना एकाने रिक्षाचालकाच्या गळ्यावर चाकू लावला व दुसऱ्याने रिक्षाचालकाच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असे एकूण १२,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल लुटला आणि घटना स्‍थळावरून पळून गेले.

दरम्‍यान, अरूण याने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी 24 तासांत चोरटयांना गजाआड केले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. या आरोपींचे फोटो रिक्षा चालकाला दाखवण्यात आल्यावर आरोपींची ओळख निष्पन्न झाली. अभिषेक राजेश तुरे आणि परेश बाबुराव मांडवकर असे या आरोपींचे नावे असून एकाला प्रेमनगर येथून अटक केली तर दुसऱ्या आरोपीला गुंफा रोड येथून अटक केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button