maharastra

लो अँड ऑर्डर ची नगर मध्ये मर्डर

नगर शहरासह उपनगरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत असून, गुन्हेगारी कारवाया करणार्‍यांमध्ये शहर पोलिसांचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बुधवारी (दि.2) भरदिवसा न्यू आर्टस् कॉलेजच्या गेटवर महाविद्यालयीन तरुणावर धारदार कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. नगरमध्ये रक्तपाताच्या घटनांची मालिका थांबता थांबत नसल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

युवराज गणेश गुंजाळ (वय अंदाजे 18, रा.सोनेवाडी, ता.नगर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो न्यू आर्टस् महाविद्यालयात कला शाखेत बारावीत शिकत आहे. युवराज कॉलेजमध्ये येण्यासाठी माळीवाडा बसस्थानकावरून महापालिकेच्या बसमध्ये चढला. न्यू आर्टस् कॉलेजच्या गेटवर उतरल्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्यापैकी एकाने युवराजवर कोयत्याने वार केले. घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी शहरातील एका दुसर्‍या महाविद्यालयात शिकत असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे.

नगर होतेय ‘हादसों का शहर’

दरम्यान, हाणामारी, तोडफोड, भरदिवसा युवतींची छेडछाड, जीवघेणा हल्ला अशा हादरवून टाकणार्‍या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. नगर शहरात गेल्या दोन महिन्यांत रक्तपाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांचे खून झाले आहेत. चाणक्य चौकात तरुणावर खुनी हल्ला झाल्याची घटना दि.24 जुलै रोजी घडली आहे. गेल्या वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणावर कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. सनी रमेश लिपाणे (रा.संभाजीनगर, तपोवन रस्ता, सावेडी) असे या आरोपीचे नाव आहे.

सनी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करायचा. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन जणांनी तारकपूर परिसरात सोमवारी (दि.31) सायंकाळी पाच वाजता एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले. ईश्वर वाकु करांडे (वय 30, रा.सांडवे, ता.नगर) या तरुणाच्या फिर्यादीवरून दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी तरुणाकडील मोबाईल व रोख असा अकरा हजार 200 रुपयांचा ऐवज लुटून नेला. शहरात सातत्याने गंभीर घटना घडत असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल नगरकरांना पडला आहे.

तोफखाना पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्याची राष्ट्रवादीची मागणी

शहरामध्ये तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोजच गुन्हे होत असून या या ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. साळवे यांच्याकडून गुन्हेगारांवर वचक निर्माण न होता त्यांना मदत होईल असे वातावरण तयार होताना दिसत आहे. त्यामुळे आजच्यासारखीच घटना वारंवार घडून पुन्हा एखाद्या युवकाचा बळी जाऊ शकतो. निरीक्षक साळवे यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button