maharastra

पायलटच्या समयसुचकतेचं कौतुक!अमित शाहांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना डगमगलं,

दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली असून आता ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

बनावट व्हीडिओमधील वक्तव्यामुळे आज दिवसभर चर्चेत असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं विमान उड्डाण करताच नियंत्रणाबाहेर गेलं होतं. ते बिहारमधील एका रॅलीसाठी जात होते. नियंत्रणाबाहेर गेलेलं विमान पायलटने समयसुचकता दाखवत नियंत्रणात आणलं. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रचारसभांना वेग आला आहे. दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली असून आता ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री यांनी आपल्या प्रचारा दौरांचा वेग वाढवला आहे. दरम्यान, अमित शहारांनी बिहारमधील बेगुसराय येथून उड्डाण करत होते. परंतु, टेक ऑफ घेताच त्यांचं हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेलं. एका व्हिडिओ क्लिपमध्ये हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना उजव्या बाजूला तोल गेला. हेलिकॉप्टर नियंत्रणात आणण्यासाठी पायलटला पुन्हा विमान जमिनीच्या दिशेने आणून टेक ऑफ करावं लागलं.बिहारमध्ये भाजपाने नितीश कुमारांच्य जेडीयुबरोबर युती केली असून जेडीयू १६ जागा आणि भाजपा १७ जागा लढवत आहेत. चिराग पासवान यांची एलजेपी आणि जितन राम मांझी यांचा हिंदुस्थान अवाम मोर्चा, इतर मित्रपक्ष अनुक्रमे ५ आणि १ जागेवर निवडणूक लढवणार आहेत.सात टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकीत बिहारमधील चार जागांसाठी पहिल्या फेरीत मतदान झाले. बिहारमधील पाच लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान गेल्या शुक्रवारी शांततेत पार पडले. यावेळी ५८.५८ टक्के मतदान झालं. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ४.३४ टक्के कमी आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button