उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या
सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत असतात. यातच देशात आणि राज्यात तापमानात भयंकर वाढ झाली असताना एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत असतात. यातच देशात आणि राज्यात तापमानात भयंकर वाढ झाली असताना एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, ”उन्हाळ्यात कारची पेट्रोल टाकी मर्यादेपेक्षा जास्त भरल्यास स्फोट होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दिवसातून एकदा पेट्रोल टाकी उघडा आणि आतला गॅस बाहेर येऊ द्या.” हा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसजच्या फोटोवर इंडियन ऑईलचा लोगोही आहे.व्हायरल मेसेजमध्ये असं लिहिलं आहे की, ”येत्या काही दिवसांत तापमान वाढणार आहे. त्यामुळे जास्त मर्यादेपर्यंत तुमच्या वाहनात पेट्रोल भरू नका. यामुळे इंधन टाकीमध्ये स्फोट होऊ शकतो. तुमची इंधन टाकी अर्धीच भरा आणि हवेसाठी त्यात जागा ठेवा.”यात पुढे लिहिलं आहे की, ”या आठवड्यात झालेल्या 5 स्फोटांपैकी सर्वाधिक अपघात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यामुळे झाले आहेत. कृपया दिवसातून एकदा पेट्रोल टाकी उघडा आणि याच्या आत जमा झालेला गॅस बाहेर येऊ द्या. हा संदेश तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतर सर्वांना पाठवा, जेणेकरून लोक हा अपघात टाळू शकतील.”मात्र व्हायरल मेसेजमध्ये जे लिहिलं आहे, ते खरं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचेच उत्तर आता पीआयबीने दिले आहे. पीआयबीने याचे फॅक्ट चेक केलं आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे.पीआयबीने ट्वीट करत म्हटलं आहे की, @IndianOilcl ने असा कोणताही इशारा दिलेला नाही. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त ओंधन भरणे पूर्णपणे सुरक्षित आहे.