गुन्हेगारीठाणे
रस्त्यावर जखमीला मदत करून,भामट्याने दुचाकी पळविली डोंबिवली-तळोजा मधील घटना
डोंबिवली जवळील खोणीगाव तळोजा रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री एका मोटार कार चालकाने एका दुचाकी स्वाराला जोराची धडक देऊन त्याला जखमी केले.

कल्याण : डोंबिवली जवळील खोणीगाव तळोजा रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री एका मोटार कार चालकाने एका दुचाकी स्वाराला जोराची धडक देऊन त्याला जखमी केले. दुचाकी स्वार रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता. त्याला एका पादचाऱ्याने एका गॅरेजच्या निवाऱ्याजवळ बसविले. आणि जखमी प्रवाशाची दुचाकी त्या पादचाऱ्याने घेऊन पळून गेला. जखमी प्रवाशी शुध्दीवर आला तेव्हा त्याला आपली दुचाकी गायब असल्याचे दिसले. आपणास मदत करणाऱ्या इसमानेच दुचाकी चोरून नेली असल्याचा संशय व्यक्त करून जखमीने मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे.