पुणे

Pune Police Mcoca Action | पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 71 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA पर्वती परिसरात दहशत माजवणाऱ्या ऋषिकेश जगताप व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’!

| पुण्यातील पर्वती परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ऋषिकेश जगताप व त्याच्या 5 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत (Pune Crime News) कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 71 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये (Pune Police Mcoca Action) कारवाई केली आहे.

दत्तवाडी येथे राहणारे फिर्य़ादी मित्रांसोबत गप्पा मारत थांबले असताना आरोपी ऋषिकेश जगताप व त्याच्या इतर साथीदारांनी दुचाकीवरुन येऊन शिवीगाळ केली. याबाबत विचारणा केली असता आरोपीने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्यावर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) 307,326,143, 144,147,148,149,323,504,506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 5 सप्टेंबर रोजी घडला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख ऋषिकेश दिपक जगताप Rishikesh Deepak Jagtap (वय-25 रा. दांडेकर पुल, पुणे), संकेत उर्फ बल्ली राहूल वाघमारे Sanket alias Bally Rahul Waghmare (वय-20 रा. सिंहगड रोड, पुणे), निखील बिभिषण लगाडे Nikhil Bibhishan Lagade (वय-28), गणेश गौतम वाघमारे Ganesh Gautam Waghmare (वय-19 दोघे रा. दांडेकर पुल), आदिनाथ सोपान साठे Adinath Sopan Sathe (वय-29 रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे), राम मोहन बनसोडे Ram Mohan Bansode (वय-23 रा. दत्तवाडी, पुणे) यांना अटक केली आहे.

टोळी प्रमुख ऋषिकेश जगताप याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. या टोळीने स्वत:च्या फायद्यासाठी तसेच इतर व्यक्तींसाठी संघटित गुन्हे केले आहेत. आरोपींनी एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन, हिंसाचार करण्याची धमकी देवून, बेकायदेशीर कृत्य केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. (Pune Police Mcoca Action)

पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jairam Paigude) यांनी
पोलिस उपायुक्त परिमंडळ- 3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम
प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (Addl CP Pravin Kumar Patil) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ- 3 सुहेल शर्मा,
सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomene),
पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), पोलीस अंमलदार दिपक लोढा, महेश चौगुले,
गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध
गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार यासारख्या कारवाया
केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत. पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे
71 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button