maharastra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा ? “लाडकी बहीण योजनेला धक्का लावायचा प्रयत्न केलात तरी…

एकनाथ शिंदे [ मुखमंत्री ] आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योनजेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचे हप्ते जमा झाले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनीही टीका केली. राज्याची तिजोरी लाडकी बहीण योजनेसाठी रिकामी केल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. तर या योजनेसाठी पुरेशी तरतूद केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान, ही योजना बंद व्हावी याकरता कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामाचा लेखाजोखाही मांडला.“आम्ही आलो की सर्व योजना बंद करणार. जेलमध्ये टाकणार. पोलखोल करणार, असं विरोधक म्हणत आहेत. पण कोणाला जेलमध्ये टाकणार? योजना बंद करणार? तुमची पोलखोल झाली आहे. कोविडमध्येच तुमची पोलखोल झाली. काहीजण तर जेलमध्येही गेले. या सर्व योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “विरोधक आता खुलेआम बोलायला लागले आहेत. एवढी इर्ष्या? लोक विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला टच करायला गेलात तर त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. एकदम करेक्ट कार्यक्रम होणार. आमच्या लाडक्या बहिणी अजिबात ऐकून घेणार नाहीत. आम्ही ठरवलं आहे की लखपती बहिणी बनवणार. माझ्या बहिणींचं काय आहे ते बघा, माझं काय माझं काय बघून उद्योजक पळून गेले. म्हणून ठरवलं आहे सर्वसामान्य माणसाला काय देणार. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येणार. म्हणून आम्ही काम करतोय”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.“आमचा विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो की लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार? मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी पैसे कुठून आणणार? सरकारकडे पैसे नाहीत, असंही म्हणतात. दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २००० रुपये करू. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू. त्यामुळे आता विरोधकांनी आधी हे ठरवावं की योजनांसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत की नाही. त्यानंतर त्यांनी टीका करावी”,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button