हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; चार अभिनेत्रींचाही समावेश हिरानंदणी पवई मधील घटना…
एका हॉटेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ,पोलिसांच्या खबरी कडून मिळताच, पवई पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेटचा शोध सुरू केला.

मुंबई : पवईतील एका हॉटेलमधून चार अभिनेत्रींची सुटका केली. हे रॅकेट चालवणाऱ्या ६० वर्षीय श्याम सुंदर अरोरा याला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. सुटका केलेल्या अभिनेत्रींना आश्रयगृहात पाठवण्यात आले आहे.सुटका केलेल्या चार महिलांपैकी एकीने एका हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेतला आहे. या महिलांच्या ग्लॅमरचा फायदा उठवत अरोरा याने त्यांना पैशाचे आमिष दाखवत वेश्याव्यवसायात ओढले. पोलिसांना खबऱ्याकडून पवईतील एका हॉटेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पवई पोलिसांनी हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलमधून चालणाऱ्या हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय रॅकेटचा शोध सुरू केला.पोलिसांचा शोध संपला आणि श्यामसुंदर अरोराला अटक करण्यात यश आले. अरोरा याने आणखी काही महिलांना हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाची शिकार बनवले आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा सहभाग आहे. पण, पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने गुप्तता पाळली आहे.महिलांना वेश्याव्यवसायाच्या टोळ्यांमध्ये काम करण्यास भाग पाडण्यास कोण जबाबदार आहे? याबाबत पोलिसांनी सांगितले की, खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर पवई पोलिसांनी बनावट ग्राहक असल्याचे भासवून या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख रुपये रोख आणि आठ मोबाईल फोन जप्त केले. संशयित म्हणून आणखी एका व्यक्तीची चौकशी सुरू आहे. पोलिस या रॅकेटची व्याप्ती किती आहे, याचा शोध आणखी घेत आहेत