मुंबई

सचिन तेंडुलकर यांची ‘स्वच्छ मुख अभियाना’ चा ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती

दक्ष पोलिस न्युज प्रतिनिधी (मुंबई) :  प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे स्माइल ॲम्बेसेडर म्ह्णून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षे ते ‘स्वच्छ मुख अभियानाचे स्माइल ॲम्बेसेडर म्हणून काम पाहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी सामंजस्य करार झाला.

सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री महाजन यांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button