आमित ठाकरे यांचा ताफा आडवल्याने कार्यकर्ते संतापले,समृध्छी महामार्ग वरील टोलनाकाच फोडला ,आमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. आता या प्रकरणावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे? टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरली. फास्ट टॅग असूनही बराचवेळ गाडी थांबवण्यात आली, टोकनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषणे बोलले असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा नाशिकला पोहोचलो तेव्हा मला कळालं टोल नाका फोडला. राज ठाकरे यांच्यामुळे अनेक टोलनाके बंद झाले, आता त्यात माझ्यामुळे आणखी एकाची भर पडली.
अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने संतापले कार्यकर्ते; समृद्धी महामार्गावरील टोलनाकाच फोडला
नांदगावकरांची प्रतिक्रिया
दरम्यान या घटनेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला माहिती मिळाल्यानंतर मी तिथल्या एसपीसोबत बोललो. अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्ट टॅग आहे. त्यामुळे टोलनाक्यावर प्रॉब्लेम येत नाही. तिथे टोलनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांनी याबाबत तिथल्या कर्मचाऱ्यांकडे विचारना केली. मात्र कर्मचारी उद्धट बोलले, त्यांनी असं बोलायला नको होतं, नेत्याच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला, असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.