Uncategorized

राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड!

वी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) एल अँड टी फायनान्स लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांशी संबंधित काही नियमांचे पालन केले नसल्यामुळे आरबीआयने एल अँड टी फायनान्स लिमिटेडवर २.५ कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

 

या प्रकरणी आरबीआयने म्हटले आहे की, कंपनीवर कारवाई करण्यापूर्वी अतिशय सखोल चौकशी करण्यात आली होती. परंतु रिपोर्ट आल्यानंतर, हे उघड झाले की, एनबीएफसीने आपल्या किरकोळ कर्जदारांना कर्ज अर्ज/मंजूरी पत्रात अनेक कॅटगरीत कर्जदारांकडून विविध व्याजदर आकारण्याचे रिस्क क्लासिफिकेशन आणि जस्टिफिकेशनचा खुलासा केला नाही.

विशेष बाब म्हणजे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एनबीएफसींनी कर्ज मंजूरीच्या वेळी सांगितलेल्या दंडात्मक व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर त्यांच्या कर्जदारांकडून वसूल केले आहेत. तसेच, व्याजदरातील बदलाबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

तसेच, या प्रकरणी कंपनीला नोटीसही देण्यात आल्याचे आरबीआयने निवेदनात म्हटले आहे. नोटीसला उत्तर देताना, एल अँड टी फायनान्स लिमिटेड आपली भूमिका योग्यरित्या मांडू शकले नाही. तसेच, त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खरे असल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत आरबीआयने एल अँड टी फायनान्स लिमिटेडवर आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, एल अँड टी फायनान्स लिमिटेड ही कंपनी अयोध्येत राम मंदिर बांधत आहे, जे १००० वर्षांपर्यंत कोणत्याही वादळ, भूकंप किंवा पुराने हादरणार नाही. विशेष म्हणजे, या कंपनीने गुजरातमधील जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीसारख्या प्रकल्पांवरही काम केले आहे. आज ही कंपनी जगातील टॉप-५ बांधकाम कंपन्यांमध्ये गणली जाते.

या क्षेत्रांमध्ये देखील कार्य करते कंपनी
एल अँड टी फायनान्स लिमिटेड ही ८० वर्षे जुनी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. सध्या ते जगातील ३०हून अधिक देशांमध्ये बांधकाम करत आहे. अभियांत्रिकी आणि बांधकामाव्यतिरिक्त, एल अँड टी फायनान्स लिमिटेड माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा यांसारख्या क्षेत्रात देखील काम करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button