maharastraमुंबई

शिवतीर्थावर आव्वाज ठाकरेंचाच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद संपून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ठाकरेंच्याच पदरात पडलं.                    यंदा दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आव्वाज घुमणार स्पष्ट झालं असून ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी तयारीही सुरू केली आहे.                                                                                                                                                                शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.                                  तशी तयारी ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आली आहे.दसरा मेळाव्यासाठी मंच उभारला असून बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत.याव्यतिरिक्त राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येणाऱ्या शिवसैनिकांच्या वाहानांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.शिवाजी पार्क मैदानावर शिंदे गटाच्या शिवसेनेनं दावा केला होता, पण नंतर तो मागे घेतल्यानं अखेर उद्धव ठाकरे गटच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यभरातून येणाऱ्या 1 लाख शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.दसरा मेळावा शिवसेनेच्या शिवसैनिकांसाठी नवचैतन्य जागवणारा दिवस.यंदा दसरा मेळाव्यात ठाकरे काय बोलणार? कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button