Diesel Theft | रात्री मुक्कामी असलेल्या एसटीतून तब्बल 140 लिटर डिझेलची चोरी; सकाळी चालक-वाहकाच्या लक्षात येताच.
येवला आगाराच्या राजापूर मुक्कामी असलेल्या उभ्या एसटीतून 140 लिटर सुमारे १२ हजार ५०० रूपये किमतीचे डिझेल चोरी (Diesel Theft) झाली आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर : येवला आगाराच्या राजापूर मुक्कामी असलेल्या उभ्या एसटीतून 140 लिटर सुमारे १२ हजार ५०० रूपये किमतीचे डिझेल चोरी (Diesel Theft) झाली आहे. याप्रकरणी येवला तालुका (Yeola Depot) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूरसह परिसरातील गावांमधील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी येवला येथे शिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थी व परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी येवला आगाराची मुक्कामी बस सुरू आहे. गुरुवारी रात्री (दि.१९) राजापूर येथे एमएच १४ बीटी ३६३२ ही बस उभी असताना अज्ञातांनी या बसमधील सुमारे १२ हजार ५०० रूपये किमतीचे १४० लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना सकाळी चालक-वाहकाच्या लक्षात आल्यानंतर येवला आगारप्रमुखांना कळवण्यात आले.
येवला आगारप्रमुख यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर येथे या अगोदरही अशाच तीन महिन्यांपूर्वी मनमाड व येवला आगाराच्या बसचे डिझेल चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. राजापूर येथे सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली खरी पण अनेक दिवसांपासून सीसीटीव्ही बंद असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या वस्तू झाल्याचा तीव्र संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. वारंवार डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने ही बस बंद होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.