Bhaubij 2023: भाऊबीज म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील मोठा सण; जाणून घ्या याचं महत्त्व
रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीज सण देखील साजरा केला जातो. पण भाऊबीजला भावा-बहिणीच्या नात्यातील मोठा सण का म्हटलं जातं? स्तंभलेखक अंशुल पांडे यांच्याकडून जाणून घ्या.
सनातन धर्मग्रंथानुसार, भाऊ – बहिणीच्या नात्यातील सर्वात मोठा सण हा भाऊबीज (Bhaubij) मानला जातो. आता तुम्ही म्हणाल, भाऊ–बहिणीच्या नात्याचा सर्वात मोठा सण तर रक्षाबंधन आहे, पण भविष्य पुराण उत्तर पर्व अध्याय क्रमांक 137 नुसार, जेव्हा देवासूर संग्रामात असुरांचा पराभव झाला, तेव्हा असुरांनी या पराभवाचं कारण शोधण्यासाठी त्यांचे गुरु शुक्राचार्यांशी संपर्क साधला. शुक्राचार्यांनी नोंदवलं की, इंद्राने (शची) इंद्राच्या संरक्षणासाठी मनगटावर संरक्षण सूत्र (रक्षा बंधन) बांधलं होतं, त्याच संरक्षण सूत्राने इंद्राला वाचवलं, ज्यामुळे रक्षाबंधन सण निर्माण झाला. हा सण नंतर लोक परंपरेनुसार फक्त भाऊ–बहिणीपुरता मर्यादित राहिला.
भाऊबीजेचं महत्त्व नेमकं काय?
आता भाऊबीजचं शास्त्रीय रूप पाहूया. स्कंद पुराण कार्तिक मास-महात्म्य अध्याय 10 – 11 नुसार कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमुनाजींनी आपले भाऊ यमराज यांची स्वतःच्या घरी सेवा केली होती आणि त्यांचं स्वागत केलं होतं. त्या दिवशी, नारकीय पापी, कर्मपाशात बांधलेल्या प्राण्यांना देखील यमराज सोडतात, जिथून ते त्यांच्या इच्छेनुसार फिरतात. या दिवशी विद्वान माणुस आपल्या घरी जेवत नाहीत. व्रतवान पुरुषांनी वस्त्र आणि दागिन्यांसह बहिणीची आनंदाने पूजा करावी. मोठ्या बहिणीला प्रणाम करून तिचे आशीर्वाद घ्यावे. त्यानंतर, सर्व बहिणींना वस्त्र आणि दागिने देऊन त्यांना संतुष्ट करावं. तुमची सक्की बहीण नसल्यास, काकांची मुलगी अथवा वडिलांच्या बहिणीच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीसोबत भाऊबीज साजरी करावी.
द्वितियाच्या दिवशी ब्रह्ममुहुर्तामध्ये उठून मनात चांगले विचार आणावे, त्यानंतर अंघोळ करुन पांढरे वस्त्र, पांढरे फुलांचे हार आणि पांढरे चंदन लावावे. नित्यकर्म पूर्ण करून, औदुंबरच्या (गुलर) वृक्षाखाली आनंदाने बसावं. तिथे एक चांगलं मंडल बनवून त्यात अष्टदल कमळ बनवून, नंतर त्या औदंबर-मंडळात भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू, भगवान शिव आणि सरस्वती देवीची पूजा करावी. चंदन, कुंकू, फुल, धूप आणि नारळ यांनी देवीची पूजा करावी. यीनंतर पूजा संपवून भगवान विष्णूची भक्ती करताना आपल्या कुटुंबातील वडील किंवा श्रेष्ठ पुरुषांना नमन केलं पाहिजे. त्यानंतर, मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन तिला नमन करावं.
अशा प्रकारे, यम द्वितियेला व्रत करून, आकस्मिक मृत्यूपासून आपण मुक्त होऊन संतान प्राप्ति करतो आणि शेवटी मोक्ष प्राप्त करतो. हे सर्व व्रत आणि विविध प्रकारचे दान गृहस्थांसाठी योग्य आहेत. यम द्वितीयेची ही कथा ऐकत असलेल्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो, असं भगवान माधव यांच विधान आहे. कार्तिक शुक्लच्या द्वितियेला यमुनेत आंघोळ करणाऱ्याला यमलोकाचं दर्शन होणार नाही. ज्यांनी या दिवशी आपल्या बहिणींना कपडे इत्यादींनी संतुष्टी दिली तर, त्यांना एक वर्षापर्यंत मतभेद आणि शत्रूची भीती बाळगण्याची गरज नाही. त्या दिवशी यमुनाजींनी यमराज देवाला आपल्या प्रेमाने भोजन खायला घातलं होतं. म्हणूनच जे व्यक्ती ह्या दिवशी बहिणीच्या हातातून खातो त्याला पैसे आणि चांगली संपत्ती मिळते. ज्या कैद्यांना राजांनी तुरुंगात ठेवलं आहे, त्यांना पण ह्या दिवशी बहिणीच्या घरी जेवायला पाठवलं पाहिजे.