जेवढा पाऊस पावसाळ्यात झाला नाही, तेवढा हिवाळ्यात, महाराष्ट्रातील ‘या’ नदीला पूर
जिल्ह्यातील जिंतूर, परभणी आणि पुर्णा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ऐन हिवाळ्यात नदीला पूर आला आहे
परभणी : राज्यात रविवारी रात्री पाऊस झाला त्यावरुन हिवाळा आहे की पावसाळा (Unseasonal Rain) असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. कारण, रविवारी रात्री दराज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यात पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात (Rain In Winter) जोरदार पाऊस म्हणण्याची वेळ आली आहे. कारण पावसाळ्यात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाला मात्र रविवारी एकाच रात्रीत पावसाने परभणी जिल्ह्यात थैमान घातले आहे. परभणी जिल्ह्यात एकाच रात्रीत तब्बल 65 मिमी पावसाची नोंदी झाली आहे. जिल्ह्यातील जिंतूर, परभणी आणि पूर्णा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ऐन हिवाळ्यात पूर्णा नदीला पूर आला आहे.
परभणी जिल्ह्यात वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे परभणी जिल्ह्यात रात्रीत तब्बल 65 मिमी पावसाटी नोंद झाली आहे. परभणी- 68.04 मिमी, जिंतुर-93.04 मिमी पुर्णा- 81.02 मिमी या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.अनेक तालुक्यात पावसाळ्यात कोरडे पडलेले छोटे मोठे नदी,नाले या पावसामुळे ओसंडून वाहत आहेत.काही ठिकाणी तूर,कापूस पिकांसह फळबागांचे नुकसान झाले असले तरी रब्बी पिकांना संजीवणी देणारा पाऊस म्हणावा लागणार आहे.
नांदेडमध्ये वीज पडून एक म्हैस दगावली
विजेच्या कडकडाटासह सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने वीज पडून एक म्हैस दगावल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पिपरी येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.शिवनाथ संजय गुटे या शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्यावर पाळीव जनावरे बांधून होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने दुधाळ म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने म्हैस दगावल्याची घटना समोर आलीय या घटनेची माहिती पिपरी या गावात पसरतात नागरिकांनी या म्हशीला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र शिवनाथ संजय गुटे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सदरील या घटनेची माहिती शेतकरी शिवनाथ संजय गुटे यांनी संबंधित विभागाला दिली आहे अशी माहिती गुट्टे यांनी दिली आहे
नांदेड